गंगापूर, (प्रतिनिधी) : शहरातील उघड्यावर व नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या मांस विक्री व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासनाने दि. एक बुधवार रोजी धडक कारवाई करत अनेक विक्रेत्यांची तपासणी केली.
या मोहिमेदरम्यान आवश्यक परवाने व कागदपत्रे नसलेल्या मांस विक्री दुकाना बंद करण्यात आल्या आहेत. कारवाई दरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रत्येक दुकानाची सखोल तपासणी करून दुकान परवाना, अन्न व्यवसाय परवाना, विक्रेत्यांचे आरोग्य प्रमाणपत्र तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांनुसार आवश्यक असलेल्या दुकान परवानासह दुकानांची कसून चौकशी कागदपत्रांची कसून पडताळणी केली.
आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरलेल्या व नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरशे, तालुका आरोग्य अधिकारी, अतिक्रमण विभागाचे सुधीर खाजेकर, प्रविण बर्फ व विजय कागडा यांच्यासह संबंधित विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
अन्न व औषध प्रशासनाने मांस विक्रेत्यांना शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे, आवश्यक परवाने अद्ययावत ठेवणे, स्वच्छतेचे निकष पाळणे आणि वैथ कागदपत्रांसहच व्यवसाय करावा, अन्यथा भविष्यातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहतील, असा इशाराही दिला आहे.













